
संदीप पोपट भोर यांची ‘मीडिया मंत्र’च्या आंबेगाव ग्रामीण प्रतिनिधीपदी नियुक्ती आंबेगाव : ‘मीडिया मंत्र’ दैनिकाच्या आंबेगाव ग्रामीण प्रतिनिधीपदी श्री. संदीप पोपट भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य व जनहिताच्या प्रश्नांना माध्यमातून वाचा फोडण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल मीडिया मंत्रचे संपादक किसन सोपान टाव्हरे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
