आंबेगाव | मीडिया मंत्र प्रतिनिधी ‘मीडिया मंत्र’ दैनिकाच्या आंबेगाव ग्रामीण प्रतिनिधीपदी श्री. संदीप पोपट भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मीडिया मंत्रच्या व्यवस्थापनाकडून त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, सांस्कृतिक, राजकीय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी श्री. भोर हे मीडिया मंत्रच्या माध्यमातून कार्य करणार आहेत. ग्रामीण भागातील घडामोडी, विकासकामे आणि जनहिताचे प्रश्न वस्तुनिष्ठ पद्धतीने समाजासमोर आणण्यावर त्यांचा भर राहणार आहे. श्री. संदीप पोपट भोर यांचा ग्रामीण भागातील नागरिकांशी असलेला संपर्क आणि सामाजिक क्षेत्रातील सहभाग लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत असून पुढील पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. मीडिया मंत्रचे संपादक किसन सोपान टाव्हरे यांनीही श्री. संदीप पोपट भोर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मीडिया मंत्र — तरुणांचा बुलंद आवाज