समाजातील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने, अचूकपणे आणि जबाबदारीने पोहोचवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
“तरुणांचा बुलंद आवाज” या भूमिकेतून मीडिया मंत्र सामान्य नागरिक, युवक, शेतकरी, विद्यार्थी, महिला, उद्योजक आणि समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते.
आमचे ध्येय
स्थानिक प्रश्नांपासून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींपर्यंत विश्वासार्ह पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना माहिती देणे, जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तनासाठी पत्रकारितेची भूमिका अधिक सक्षम करणे हे मीडिया मंत्रचे ध्येय आहे.आमची पत्रकारिता
राजकारण, प्रशासन, शिक्षण, शेती, उद्योग-व्यवसाय, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडी तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना आम्ही प्राधान्य देतो.बातमी देताना तथ्यांची पडताळणी, संबंधित पक्षांची बाजू आणि पत्रकारितेतील नैतिक मूल्ये यांचा आदर करण्याचा आमचा प्रयत्न असतो.
डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावाचा विचार करून प्रिंट, ई-पेपर आणि डिजिटल माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
आमची मूल्ये
सत्य • निष्पक्षता • निर्भीड पत्रकारिता • विश्वासार्हता • सामाजिक जबाबदारीमीडिया मंत्रसाठी पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या प्रसिद्ध करणे नाही; तर सर्वसामान्यांचा आवाज योग्य व्यासपीठावर पोहोचवणे, जनहिताच्या विषयांना वाचा फोडणे आणि समाजाप्रती जबाबदारीने कार्य करणे होय.
प्रकाशन माहिती
मीडिया मंत्र – दैनिक मराठीPRGI No.: MH/MAR/26/A/6784
संपादक: किसन सोपान टाव्हरे
पत्ता: House No. 3678, Awasari Khurd, Tal. Ambegaon, Dist. Pune – 412405, Maharashtra, India
संपर्क: +91 97303 58603
ई-मेल: mediamantra.pune@gmail.com
