सौ. वैशालीताई बाबाजी काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कातकरी वस्तीतील ३२ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
मैत्रीण ग्रुप राजगुरुनगरचा कडूस येथील गोलापूर शाळेत उपक्रम
कडूस, ता. खेड | मीडिया मंत्र न्यूज प्रतिनिधी : विनोद बोंबले
मैत्रीण ग्रुप राजगुरुनगरतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही कडूस येथील गोलापूर शाळेतील कातकरी वस्तीमधील ३२ गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पाण्याच्या बाटल्या, वह्या, पुस्तके आणि इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रुपच्या सदस्या सौ. वैशालीताई बाबाजी काळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला. त्यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला.
उपक्रमासाठी विशेष सहकार्य
सौ. वैशालीताई बाबाजी काळे, श्रीमती विमल हिराचंद राठोड, सौ. टीना अनिष ओसवाल आणि सौ. निशा सचिन मांजरे (चाकण) यांचे विशेष सहकार्य लाभले. आमदार श्री. बाबाजी रामचंद्र काळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. समाजसेवक श्री. कैलाश दुधाळे यांनीही उपक्रमाला सहकार्य केले.
दानशूर सदस्यांचे मोलाचे योगदान
मैत्रीण ग्रुपच्या सदस्यांसह डॉ. कोमल गोरे, सीए करिश्मा सैरभ लुनावत, सौ. उमा हेडा, डॉ. प्रमिला बांबळे, सौ. ऊर्मिलाताई सांडभोर, सौ. अर्चना देवराम पोतेकर, कु. रेवा रुपाली महेश टाकळकर, सौ. संध्या शैलेन्द्र कांबळे, डॉ. वंदना प्रदिप शेवाळे, सौ. अलका सुभाष कोकणे/राहाणे, सौ. ममता राठोड, सौ. कैतकी निलेश शहा, सौ. निलम अनिल शहा, सौ. संगिता सतिश शहा, सौ. जयश्री रविंद्र जगताप, सौ. धनश्री यतिन भंडारी, श्रीमती पुनम दोंडकर, सौ. पिंकी गदिया (कामशेत), सौ. प्राची जाधव, सौ. वैशाली जेधे, सौ. शिल्पा संजय बुरसे, सौ. अरुंधती पराग टाकळकर, सौ. सुनंदा बाळासाहेब टाकळकर, डॉ. वंदना हेमंत शिंदे, सौ. पायल चौधरी, सौ. राखी सचिन ओसवाल, सौ. विणा कुटे, शिव पुष्प नर्सरी राजगुरुनगर, सौ. अल्मास मनियार, सौ. पौर्णिमा देवरकर, सौ. सारिका पंकज बोरा, सौ. आश्लेषा पुलाटे, सौ. सारिका ठक्कर, सौ. रामेश्वरी कडलग, सौ. मीना नाझरे, श्रीमती कीर्तीमालिनी कुलकर्णी, सौ. स्वाती त्रिभुवन, सौ. हंसाबेन रुपडा, कु. मुक्ता दादासाहेब गारगोटे, कु. जिया नम्रता स्वप्निल शहा, कु. चैहेल पुजा रोनक ओहरा, सपना राठोड आणि ‘पुस्तक मैत्री’ यांचे मोलाचे योगदान लाभले. एका दानशूर व्यक्तीनेही उपक्रमाला मदत केली.
कार्यक्रमाला उपस्थिती
कार्यक्रमाला श्री. स्वप्निल ढमाले, श्री. अजितदादा ढमाले, श्री. सुमित ढमाले, श्री. ओमकार नाईकरे, श्री. संकेत नाईकरे, श्री. ऋषी देवदेरे, श्री. सिद्धी राम बोरगावे आणि प्रियंका समावंशी उपस्थित होते.





