अक्षय अरुण बढे यांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट निवेदक पुरस्कार २०२६’
अहिल्यानगर येथे राखी रासकर यांच्या हस्ते सन्मान; कांदळी ग्रामस्थांकडून अभिनंदन
वडगाव कांदळी : दैनिक लोक परिवर्तनच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट निवेदक पुरस्कार २०२६’ अक्षय अरुण बढे यांना प्रदान करण्यात आला. अहिल्यानगर येथील नाथ कृपा सांस्कृतिक भवनात आयोजित शानदार सोहळ्यात श्रीमती राखी रासकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, अशी माहिती दैनिक लोक परिवर्तनचे संपादक आबासाहेब शिरसाट यांनी दिली.
समर्पित कार्य आणि समाजसेवेचा गौरव
अक्षय बढे यांना त्यांच्या समर्पित कार्यासाठी आणि समाजसेवक म्हणून केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे कार्यकारी संपादक डॉ. भारत भालेराव यांनी सांगितले.
मानवतेच्या सेवेसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आल्याचे वृत्त संपादक अशोक सूर्यवंशी आणि व्यवस्थापक डॉ. मुकुंद निघोजकर यांनी सांगितले.
सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती
यावेळी श्रीमती राखी रासकर, पत्रकार दत्ता गाडगे, रेश्मा अरुण बढे, काजल अक्षय बढे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कांदळी ग्रामस्थांकडून अभिनंदन
अक्षय अरुण बढे यांना उत्कृष्ट निवेदक पुरस्कार मिळाल्याबद्दल कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे, जुन्नर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे आणि कांदळी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे अक्षय बढे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.



