राजे नागरी सहकारी पतसंस्था सामाजिक उपक्रमांत अग्रेसर
तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; ठाकरवाडीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन सत्कार
वारूळवाडी : राजे नागरी सहकारी पतसंस्थेची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा सिल्वर पार्क, वारूळवाडी येथील सभागृहात उत्साही वातावरणात संपन्न झाली. संस्थेला सन २०२५–२६ या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षण वर्ग ‘ब’ प्राप्त झाला आहे. पुढील आर्थिक वर्षात संस्था नफ्यात येऊन लेखापरीक्षण वर्ग ‘अ’ प्राप्त करेल, असा विश्वास उपस्थित हितचिंतकांनी व्यक्त केला.
सभेत विषयपत्रिकेवरील १ ते १२ विषयांवर संचालक आणि सभासदांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुरज वाजगे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी उपस्थित सभासद आणि संचालकांना मार्गदर्शन केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी जपत संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ठाकरवाडी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.
तरुणांच्या सहभागातून सामाजिक कार्याला बळ
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जुबेर शेख यांनी संस्थेमार्फत आतापर्यंत राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. राजे ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि राजे नागरी सहकारी पतसंस्थेतील तरुण संचालक व सभासदांनी एकत्र येऊन सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरिश्चंद्र नरसुडे यांनी संस्थेच्या कार्याबाबत आपले विचार मांडले. संस्था लवकरच नावारूपाला येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभासद मनोहर वायकर यांनी संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांबाबत समाधान व्यक्त करून असे उपक्रम सातत्याने राबवावेत, असा मोलाचा सल्ला दिला.
संचालक, पदाधिकारी आणि मान्यवरांची उपस्थिती
सभेला उपाध्यक्ष योगेश गायकवाड, सचिव जितेंद्र अडसरे, संचालक विशाल गोरडे, पंकज भालेराव, सुशील सोनवणे, सकलेन आतार, विक्रांत मेहेर, संजय वारुळे, संचालिका सीमा औटी आणि शैला वाव्हळ उपस्थित होते. तसेच कायदेविषयक सल्लागार ॲड. आसिफ सय्यद, सल्लागार मुबारक मुजावर, अभिषेक भुजबळ आणि जावेद पटेल यांची उपस्थिती होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांका रासकर, क्लार्क प्रांजल राजगुरू, मुख्य वसुली अधिकारी स्वप्निल भुजबळ, दैनंदिन ठेव प्रतिनिधी वैशाली भुजबळ आणि वैशाली महाले आदी उपस्थित होते.
यावेळी वारूळवाडीचे माजी उपसरपंच प्रकाश भालेकर, सामाजिक कार्यकर्ते योगेश तोडकरी आणि नितीन भालेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ मार्गदर्शक अस्लम शेख, रामदास वारुळे, सामाजिक कार्यकर्ते गौतम औटी, वारूळवाडीच्या माजी उपसरपंच ज्योती संते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या थोरात मॅडम, पत्रकार अशपाक पटेल आणि किशोर वारुळे उपस्थित होते. मार्गदर्शक जावेद शेख, भाग्यश्रीताई ताजणे आणि सर्पमित्र नागेश्वरी मॅडम यांनीही आवर्जून उपस्थिती लावली.
सभेचे प्रास्ताविक नवनाथ पोकळे यांनी केले. सूत्रसंचालन तज्ज्ञ सल्लागार डॉ. सत्यवान थोरात यांनी केले, तर संस्थेचे संचालक निलेश रसाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

