आंबेगाव तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी सुनील भेके यांची बिनविरोध निवड
त्रैवार्षिक अधिवेशनात नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड; मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार
मंचर : आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात पार पडले. तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
या अधिवेशनामध्ये आंबेगाव तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी सुनील भेके यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे उपस्थित पदाधिकारी आणि शिक्षकांनी स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नूतन कार्यकारिणी
- अध्यक्ष : सुनील भेके
- नेते : नारायण काळे
- कार्याध्यक्ष : विजय डोके
- सरचिटणीस : विकास बाणखेले
- कोषाध्यक्ष : पांडुरंग बुट्टे
नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष महेश बढे, पुणे जिल्हा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वाळुंज, माजी कार्याध्यक्ष बाळासाहेब कानडे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार चासकर, तालुका संघाचे नेते विजय घिसे, पतसंस्थेचे माजी सभापती विजय वळसे, उदयकुमार लोंढे, नारायण गोरे आणि भास्कर चासकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सुनील पाटील, सुनील बुरसे, संजीव ढोंगे, मारुती शिंगाडे, राजेंद्र चासकर, राजाराम काथेर, आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे उपसभापती सोपान सैद, खजिनदार बाळासाहेब साबळे, मानद सचिव सखाराम मुंजाळ, विद्यमान संचालक संजय केंगले, संतोष लबडे, दत्तात्रय मेचकर, बाबाजी गाढवे, बाळासाहेब सैद, विकास बाणखेले आणि संतोष पोखरकर उपस्थित होते.
तसेच तालुका शिक्षक संघ आणि शिक्षक पतसंस्थेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





