अवसरी खुर्दमध्ये १५ जानेवारीपासून जगतजननी देवी आई अखंड हरिनाम सप्ताह
ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणासह आठ दिवस नामवंत कीर्तनकारांची सेवा; भाविकांच्या सुविधांसाठी मंदिर परिसरात कामे सुरू
अवसरी खुर्द : येथील श्री भैरवनाथ विद्यालयाच्या पाठीमागील जगतजननी देवी आई मंदिर परिसरात १५ ते २२ जानेवारी २०२७ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहासाठी पुणे जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
दिवसवार कीर्तनसेवा
दररोज सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत
सप्ताहादरम्यान आठ दिवसांत सुमारे पाच हजार भाविकांसाठी अन्नदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांची सोय व्हावी यासाठी देवी आई सप्ताह कमिटीच्या नियोजनाखाली मंदिर परिसरात सुमारे २५ लाख रुपयांची कामे सुरू आहेत.
सप्ताहाचा प्रारंभ १५ जानेवारी रोजी होणार असून २२ जानेवारी रोजी सोहळ्याची सांगता होईल. कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला असल्याचे सप्ताह कमिटीकडून सांगण्यात आले.





