विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी पराग मिल्क उद्योग समूहाचा स्तुत्य उपक्रम!
अवसरी खुर्दच्या श्री भैरवनाथ विद्यालयाला जलशुद्धीकरण यंत्रणा, वॉटर चिलर, नळकोंडाळे आणि पत्राशेडची सुविधा
अवसरी खुर्द : विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि शैक्षणिक गुणवत्ता यांना प्राधान्य देणाऱ्या श्री भैरवनाथ माध्यमिक व सौ. वनिता विठ्ठलराव अभंग तांत्रिक व किमान कौशल्य विद्यालय, अवसरी खुर्द येथे विद्यार्थ्यांसाठी शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पराग मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट उद्योग समूहाच्या माध्यमातून विद्यालयाला आरओ जलशुद्धीकरण यंत्रणा, वॉटर चिलर, नळकोंडाळे तसेच ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षणासाठी पत्राशेड उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना स्वच्छ, शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, विशेषतः उन्हाळ्यात थंड पाण्याची सुविधा मिळावी, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उद्योग समूहाचे प्रमुख श्री. देवेंद्रशेठ शहा यांनी विद्यालयाच्या गरजेची दखल घेऊन हे मोलाचे योगदान दिले. या सुविधेमुळे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन उद्योग समूहाने केलेले हे योगदान त्यांच्या आरोग्यदायी आणि सुखकर शैक्षणिक वाटचालीसाठी मोलाचे ठरणार असल्याची भावना विद्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमासाठी विद्यालयाच्या विविध समित्यांचे सदस्य, शाळेचे माजी विद्यार्थी तसेच पराग उद्योग समूहाच्या मानव संसाधन विभागातील श्री. विकास भोर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. देवेंद्रशेठ शहा आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने आभार मानण्यात आले.
“विद्यार्थ्यांसाठी शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. देवेंद्रशेठ शहा, पराग उद्योग समूह आणि या कार्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन.”





