NCRDs न्यू इंग्लिश स्कूल, लाखणगावचा
तालुकास्तरीय शासकीय कुस्ती स्पर्धेत दबदबा कायम
पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
मंचर प्रतिनिधी (अनिल देसले): पुणे जिल्हा क्रीडा परिषद, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबेगाव तालुकास्तरीय शासकीय कुस्ती स्पर्धा तालुका क्रीडा संकुल, मंचर येथे उत्साहात पार पडली.
🤼 स्पर्धेत सहभागी विद्यार्थी
🏆 तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी
या गुणवंत खेळाडूंनी विविध गटांत उत्कृष्ट कौशल्य, आत्मविश्वास आणि जिद्दीचे प्रदर्शन करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या कामगिरीमुळे NCRDs न्यू इंग्लिश स्कूल, लाखणगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
🎯 विद्यार्थ्यांना लाभलेले मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. प्रवीण शिकारे, कल्पना राजगुरू, छाया वाघुंडे, रसिका शिंदे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अनिल देसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
🌟 मान्यवरांकडून अभिनंदन
विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा माजी सहकारमंत्री माननीय नामदार श्री. दिलीपरावजी वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा. श्री. विवेकदादा वळसे पाटील, NCRD शिक्षण संस्थेच्या संचालिका मा. पूर्वाताई वळसे पाटील, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रदीपदादा वळसे पाटील आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी मा. श्री. अमरजीत खराडे यांनी अभिनंदन केले.
शेतमाल प्रक्रिया संघाचे अध्यक्ष श्री. सतीशराव रोडे पाटील, खरेदी-विक्री संघाचे संचालक श्री. मनोजदादा रोडे पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नवनाथ गाडगे, उपाध्यक्ष श्री. प्रदीप रोडे पाटील आणि सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री. प्रवीण शिकारे यांचे अभिनंदन केले.
सर्व मान्यवरांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आगामी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.



