आंबेगाव तालुका · २४ सप्टेंबर २०२६
तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत हिरकणी विद्यालयाचे नेत्रदीपक यश
१४ वर्षांखालील मुला-मुलींच्या आणि १७ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक
सोमवारी (दि. २१) निरगुडसर येथे झालेल्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत हिरकणी विद्यालय, गावडेवाडीने तीन गटांत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली.
१४ वर्षांखालील मुले व मुली · १७ वर्षांखालील मुले
जिल्हा क्रीडा परिषद पुणे, क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, निरगुडसर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या संघांनी सहभाग घेतला.
तालुका क्रीडा अधिकारी शोभा पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष विनोद बोंबले, कार्याध्यक्ष राजू आढळराव पाटील, काळभैरवनाथ विद्यालय, खडकीचे मुख्याध्यापक अविनाश ठाकूर, माजी प्राचार्य सुनंदा गोरे तसेच तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
आंबेगाव तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण हिंगे आणि विद्यालयाचे क्रीडाशिक्षक भरत खिलारी यांनी स्पर्धेचे नियोजन केले. बक्षीस वितरणावेळी निरगुडेश्वर शिक्षण विकास मंडळाचे सचिव प्रकाश तापकीर, संचालक सुनील वळसे पाटील आणि श्रीकांत पवार उपस्थित होते. विजयी संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
गटनिहाय अंतिम निकाल
१४ वर्षांखालील मुले
- प्रथमहिरकणी विद्यालय, गावडेवाडी
- द्वितीयपं. ज. नेहरू विद्यालय, निरगुडसर
- तृतीयमहात्मा गांधी विद्यालय, मंचर
१४ वर्षांखालील मुली
- प्रथमहिरकणी विद्यालय, गावडेवाडी
- द्वितीयभीमाशंकर विद्यालय, शिनोली
- तृतीयजगदीशचंद्र महेंद्र विद्यालय, चिंचोली कोकणे
१७ वर्षांखालील मुले
- प्रथमहिरकणी विद्यालय, गावडेवाडी
- द्वितीयजनता विद्यालय, घोडेगाव
- तृतीयहनुमान विद्यालय, गंगापूर बु.
१७ वर्षांखालील मुली
- प्रथमनरसिंह विद्यालय, राजणी
- द्वितीयजगदीशचंद्र महेंद्र विद्यालय, चिंचोली कोकणे
- तृतीयमहात्मा गांधी विद्यालय, मंचर
१९ वर्षांखालील मुले
- प्रथमअण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर
- द्वितीयमहात्मा गांधी विद्यालय, मंचर
- तृतीयडेक्कन मराठा ज्युनिअर कॉलेज, लांडेवाडी
१९ वर्षांखालील मुली
- प्रथमजनता विद्या मंदिर ज्युनिअर कॉलेज, घोडेगाव
- द्वितीयमहात्मा गांधी विद्यालय, मंचर
- तृतीयभीमाशंकर विद्यालय, शिरोली



