नगदवाडी येथे विठ्ठल–रुक्मिणी सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न
पांडुरंग पवार यांच्या विशेष प्रयत्नातून पाच लाख रुपयांचा निधी; बाळासाहेब बढे यांच्या हस्ते भूमिपूजन
वडगाव कांदळी : नगदवाडी (ता. जुन्नर) येथील विठ्ठल–रुक्मिणी सभामंडपाचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या विशेष प्रयत्नातून स्थानिक विकास निधीतून या कामासाठी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
यावेळी वडगाव कांदळी गावच्या सरपंच उल्काताई श्रीकांत पाचपुते, माजी सरपंच रामदास पवार, कांदळीचे माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य अनिल भोर, ग्रामपंचायत सदस्य निलेश बढे, माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजीशेठ बढे, साईलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्रा. श्रीकांत पाचपुते, नगदवाडी सोसायटीचे चेअरमन पोपट बढे, संचालक विश्वास बढे, रघुनाथ बढे, कालिकामाता पतसंस्थेचे चेअरमन कृषीभूषण मुरलीधर गुंजाळ, कंत्राटदार निवृत्ती बेल्हेकर आणि नाशिक विभागाचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रणेश गुंजाळ उपस्थित होते.
तसेच गणेश भोर, शामराव बढे, मंगेश बढे, दिनकर बढे, चंद्रकांत बढे, जालिंदर बढे, शांताराम बढे, काशिनाथ बढे, गंगाराम बढे, तुळशीराम बढे, पांडुरंग बढे, अंबादास बढे, श्रीधर बढे, सोहम बढे, मनीषा बढे, रंजना बढे, सुनंदा बढे, छाया बढे, सविता बढे, वंदना बढे आणि सुमन बढे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निधी उपलब्ध केल्याबद्दल ग्रामस्थांकडून आभार
विठ्ठल–रुक्मिणी सभामंडपाच्या कामासाठी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी पांडुरंग पवार यांचे आभार मानले.
या प्रसंगी वडगावचे माजी सरपंच रामदास पवार व मुरलीधर गुंजाळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामराव बढे यांनी केले.





