कृषी • सहकार

नगदवाडी सोसायटीकडून रब्बी हंगामातील पीककर्जाचे वाटप

वेळेवर कर्जवाटप झाल्याने सभासदांनी व्यक्त केले समाधान

वडगाव कांदळी :

नगदवाडी विविध कार्यकारी सोसायटी, नगदवाडी (ता. जुन्नर) यांच्या वतीने रब्बी हंगामातील पीककर्जाचे वाटप करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विकास अधिकारी अमित जाधव, शाखाधिकारी रवींद्र घोगरे, रोखपाल सूरज कुदळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नबाजी घाडगे, सोसायटीचे चेअरमन पोपट बढे, माजी चेअरमन सुरेश बढे, संचालक विश्वास बढे, शिवशंकर मांडे, रघुनाथ बढे, सचिव अमोल गुंजाळ, मदतनीस दत्तात्रेय थोरात, मच्छिंद्र भोर आणि सुभाष औटी उपस्थित होते.

संस्थेची वाटचाल आणि आर्थिक माहिती

नगदवाडी विविध कार्यकारी सोसायटीची स्थापना १९५९ साली झाली असून संस्थेचे १,००७ सभासद आहेत. संस्थेचे भागभांडवल ३४ लाख ५२ हजार रुपये असून कर्जवितरण ४ कोटी रुपयांचे आहे. संस्थेला ‘अ’ वर्गाचे ऑडिट प्राप्त झाले आहे. सभासदांना ९ टक्के दराने लाभांश देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

संस्थेमार्फत सभासदांना शून्य टक्के व्याजदराने पीककर्जाचे वाटप करण्यात येत आहे. जास्तीत जास्त पीककर्ज घेऊन शून्य टक्के व्याजदराच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन पोपट बढे यांनी केले. नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांचे त्यांनी आभार मानले.

संस्थेचे मार्गदर्शक व कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे, जुन्नर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे, माजी चेअरमन सुरेश बढे, व्हाइस चेअरमन दिनकर कुतळ तसेच संचालक शिवशंकर मांडे, विश्वास बढे, गणेश भोर, सिद्धार्थ बढे, देवराम थोरात, गुलाब कुतळ, रघुनाथ बढे, विकास कुतळ, संगीता बढे आणि अलका भोर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल पोपट बढे यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी सभासदांना पीककर्जाचे वाटप करण्यात आले. वेळेवर कर्ज मिळाल्याने शेतीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत होणार असल्याची भावना सभासदांनी व्यक्त केली. रब्बी हंगामासाठी वेळेत कर्जवाटप झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

नगदवाडी • ता. जुन्नर