Media Mantra News
सहकार क्षेत्र प्रतिनिधी मिडिया मंत्र : डॉ. सत्यवान थोरात

श्री. बिरोबा महाराज पतसंस्थेला ४० लाख रुपयांचा नफा

सभासदांना १४ टक्के लाभांश व दिवाळी भेटवस्तू देण्याचा मनोदय

श्री. बिरोबा महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, वडगाव (कांदळी), ता. जुन्नर, जि. पुणे या पतसंस्थेला सन २०२५–२६ या आर्थिक वर्षात ४० लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना १४ टक्के लाभांश व दिवाळी भेटवस्तू देण्याचा संस्थेचा मनोदय आहे, अशी माहिती चेअरमन सचिन निलख यांनी दिली.

वडगाव (कांदळी) येथील ग्रामपंचायतीच्या नवीन सभागृहामध्ये संस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सचिन निलख यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सर्वसंमतीने मान्यता देण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, योजना आणि भविष्यातील नियोजनाबद्दल सविस्तर माहिती दिली. संस्थेचे ज्येष्ठ सभासद डॉ. सत्यवान थोरात यांनी संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करून उपस्थित सभासदांना मोलाचे मार्गदर्शन केले.

संस्थेची आर्थिक स्थिती

१७ कोटी रुपये ठेवी
१२ कोटी ३० लाख रुपये कर्जवाटप
२१ कोटी ७४ लाख रुपये खेळते भागभांडवल
१ कोटी ४६ लाख रुपये वसूल भागभांडवल
२ कोटी २१ लाख रुपये राखीव निधी
२ कोटी २१ लाख रुपये या आर्थिक वर्षातील उत्पन्न

पुढील आर्थिक वर्षात २० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट संस्थेने समोर ठेवले आहे.

संस्थेचे व्हा. चेअरमन देविदास भोर यांनी प्रास्ताविक केले. सभेचे सूत्रसंचालन अंतर्गत हिशोब तपासणीस बबन भालेराव यांनी केले. संस्थेचे संचालक पंढरीनाथ पाचपुते यांनी उपस्थित सर्व सभासदांचे आभार मानले.

याप्रसंगी संचालक ज्ञानेश्वर थोरात, पंढरीनाथ पाचपुते, चंद्रकांत पाचपुते, डॉ. निजाम पठाण, संतोष लांडगे, अविनाश पवार, रवींद्र रोकडे, अंजना नरवडे, मनिषा सोनवणे, तज्ञ संचालक संभाजी पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार मुटके, संगणक ऑपरेटर अजित रोकडे, अंतर्गत हिशोब तपासणीस बबन भालेराव आणि मदतीस रमेश पाचपुते उपस्थित होते.

यावेळी बिरोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त बाबाजी लांडगे, सचिव बबन पाचपुते, गावचे माजी उपसरपंच विठ्ठल पाचपुते आणि माजी सनदी अधिकारी शंकर पाचपुते यांनी चर्चेत सहभाग घेतला. सेवानिवृत्त बँक अधिकारी रामकृष्ण पाचपुते, वडगाव (कांदळी) विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन नितीन पवार, माजी आदर्श सरपंच ज्ञानेश्वर निलख आणि शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभा पाचपुते यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेला भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या.

या आर्थिक वर्षात संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाल्यामुळे मोठ्या संख्येने सभासद आणि हितचिंतक उपस्थित होते. आर्थिकदृष्ट्या पतसंस्था पूर्णपणे सक्षम असून सर्व सभासदांनी आपले सर्व व्यवहार या संस्थेतून केल्यास संस्थेची आणखी आर्थिक प्रगती होईल, असा विचार उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.

MEDIA MANTRA NEWS