अनंत ग्रामीण पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात; ४६ लाख ३३ हजारांचा निव्वळ नफा
संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’; सलग १५ वर्षे सभासदांना १५ टक्के लाभांश
वडगाव कांदळी : अनंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, १४ नंबर, नगदवाडी, कांदळी (ता. जुन्नर) या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन तथा कांदळी गावचे प्रथम लोकनियुक्त आदर्श सरपंच विक्रमशेठ भोर यांच्या अध्यक्षतेखाली अंजली मंगल कार्यालय, नगदवाडी येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली.
संस्थेची आर्थिक प्रगती
सलग १५ वर्षे १५ टक्के लाभांश
सन १९९० मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे १ हजार ५८५ सभासद आहेत. संस्थेचा स्वनिधी ३ कोटी ७३ लाख रुपये, ठेवी २० कोटी ६० लाख रुपये, तर गुंतवणूक ७ कोटी ७६ लाख रुपये आहे. सन २०२५–२६ या आर्थिक वर्षात संस्थेने १३ कोटी ८२ लाख रुपयांचे कर्जवाटप केले असून, ४६ लाख ३३ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त झाला आहे.
सभासदांना सलग १५ वर्षे १५ टक्के लाभांश व आकर्षक भेटवस्तू देणारी अनंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ही जुन्नर तालुक्यातील महत्त्वपूर्ण पतसंस्था असल्याची माहिती चेअरमन विक्रम भोर यांनी दिली.
सभासदांसाठी आधुनिक बँकिंग सुविधा
संस्थेला सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळत असून संस्थेत संगणकीकृत सेवा उपलब्ध आहेत. मोबाईल बँकिंग, एनईएफटी, आरटीजीएस, एसएमएस, नेट बँकिंग, सोनेतारण कर्ज, वीजबिल भरणा केंद्र आणि एटीएम सुविधा उपलब्ध असल्याचे विक्रम भोर यांनी सांगितले.
सभासदांचे हक्क व जबाबदाऱ्यांवर मार्गदर्शन
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणे येथील प्रशिक्षक खांडगे यांनी सभासदांना त्यांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि हक्क यांविषयी मार्गदर्शन केले. नारायण भोर, ऋषिकेश भोर, शांताराम घाडगे, बबन भालेराव, पद्माकर साबळे यांच्यासह अनेक सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला.
मान्यवर व सभासदांची उपस्थिती
सभेला संस्थेचे व्हाईस चेअरमन सतीश कुतळ, सचिव अनिल यादव, खजिनदार जयराज रजपुत, संचालक देवराम भोर, रवींद्र बढे, सुधीर भोर, अरुण भोर, उत्तम शिंदे, अशोक बढे, बाबासाहेब त्रिभुवन, सुनंदा भोर, प्रमिला घाडगे, संस्थेच्या व्यवस्थापक ऋतू टेंभेकर, अंकिता नेहरकर, पद्मा भोर आणि हेमलता भोर उपस्थित होते.
संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षक डी. बी. औटी, कांदळी गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच डॉ. पल्लवी भोर, टॅक्स ऑडिटर राजकुमार कोल्हे, नगदवाडी सोसायटीचे चेअरमन पोपट बढे, माजी चेअरमन सुरेश बढे, दिनकर कुतळ, विश्वास बढे, ह.भ.प. दादा महाराज गुंजाळ, ताबाजी गुंजाळ, रामदास गुंजाळ, शामराव बढे, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश भोर, अनिल भोर आणि विनायक गुंजाळ यांची उपस्थिती होती.
तसेच संस्थेचे माजी चेअरमन हरिभाऊशेठ भोर, नारायणशेठ भोर, श्रीमती कमल भोर, माजी सरपंच सुजाता सोमनाथ रेपाळे, शांताराम घाडगे, अभ्युदय बँकेच्या संचालिका अलकनंदा हांडे, महेश बढे, दयानंद बढे, बबन कुतळ, प्रमोद भोर, संकेत भोर, दिलीप भोर, रवींद्र भोर, जीवन भोर, संजय भोर, सचिन भोर, शांताराम बढे आणि दत्तात्रय काळे यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन संतोष मुळे यांनी केले. अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी ऋतू टेंभेकर यांनी केले, तर अनिल यादव यांनी आभार मानले.





