पुणे जिल्हा २४ सप्टेंबर २०२६

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची काकडे कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

दिवंगत रमणशेठ काकडे आणि आशालता काकडे यांच्या आठवणींना उजाळा

पुणे प्रतिनिधी : अनिल देसले

पिंपळवंडी : गावाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या काकडे कुटुंबीयांची महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी सुभाष विद्या मंडळाचे अध्यक्ष दिवंगत शिक्षणमहर्षी रमणशेठ दशरथशेठ काकडे आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालिका दिवंगत आशालता रमणशेठ काकडे यांच्या विविध आठवणींना उजाळा देण्यात आला.

ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड यांसह सहा-सात देशांच्या दौऱ्यांदरम्यान त्यांच्यासोबत घालवलेल्या सुमारे महिनाभराच्या काळाच्याही आठवणी यावेळी सांगण्यात आल्या.

याप्रसंगी पुणे जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे, उद्योजक राहुल काकडे, ॲड. आर्यन काकडे, कुटुंबीय, स्थानिक ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मीडिया मंत्र न्यूज | तरुणांचा बुलंद आवाज